कला स्पर्धा, फोटो स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान स्पर्धा

खुला आसमान कशासाठी?

मुलांची कल्पनाशक्‍ती आणि सर्जनशीलता कलेच्‍या माध्यमातून खूप छान व्यक्त होऊ शकते. स्‍थानिक बुद्धिमत्ता (Spatial intelligence) ही नऊ मूलभूत बुद्धिमत्तांपैकी एक आहे. भारतातील औपचारिक शिक्षणात स्थानिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी फारसे काही केले जात नाही. अधिक

खुला आसमान काय आहे?

आर्ट इंडिया फाऊंडेशन या सार्वजनिक धर्मादाय संस्‍थेद्वारे खुला आसमान व्‍यवस्‍थापित केले जाते. इंडिया आर्ट डॉट कॉम हे आर्ट इंडिया फाऊंडेशन या संस्‍थेचे ऑनलाईन भागीदार आहे. मुलांच्‍या सर्जनशील अभिव्‍यक्‍तीसाठी खुला आसमान एक उत्तम विनामूल्‍य व्‍यासपीठ आहे. बाल कलाकार व युवा कलाकारंसाठी खुला आसमान विनामूल्‍य कला स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, रेखाचित्र स्‍पर्धा आणि विज्ञान स्‍पर्धा राबविते. मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी खुला आसमान विविध प्रकारचे लेख आणि व्हिडिओ सामुग्री निर्माण करते.अधिक

मुलांसाठी खुला आसमान स्पर्धा (5 ते 15 वर्षे)
व तरुण प्रौढ (15 ते 25 वर्षे)

तिमाही प्रतियोगिता २४ x ७ ऑनलाइन जमा करें. नि: शुल्क प्रवेश
चालू स्‍पर्धा 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत खुली आहे

स्‍पर्धा विषय

वन आणि वन्‍यजीवन

Art contest for children theme - Forest and Wildlifeवनसंपत्ती आपली जीवनरेखा आहे, आशा आहे. वनांमध्ये असलेली झाडे, वृक्ष, प्राणी, पक्षी यांच्‍या विविध प्रजातींमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो. वन आणि वन्‍यजीवन याबद्दल तुमच्‍या भावना ए ४ वा ए ३ आकारांच्‍या चित्रांतून व्‍यक्‍त करा. चित्राचे रेखाटन करा अथवा रंगवा. तुम्‍ही काढलेली शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे, व्‍यंगचित्रे, कोलाज चित्रे यांच्‍या प्रतिमा सबमिट करा. प्रत्‍येक प्रतिमेबरोबर त्‍याचे शीर्षक, वर्णन व वापरलेल्‍या माध्यमाचा उल्लेख करा.सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

इतिहास आणि वारसा

Painting contest for children theme - History and Heritageआपला भूतकाळ जाणून घेण्यासाठी आपल्‍याला जिज्ञासा असते. जुने अवशेष, उत्‍खननातून लागलेले शोध, किल्ले, राजवाडे, मंदिरे, गिरीजागृहे, मशिदी आणि इतर वारसा असलेल्‍या वास्‍तू बघणे खूपच मनोरंजक असते. ऐतिहासिक वारसा असलेले वास्तू आणि इतिहास याबद्दलच्या तुमच्‍या भावना ए४ वा ए३ आकारांच्‍या चित्रांतून व्‍यक्‍त करा. चित्रांचे रेखाटन करा अथवा रंगवा. तुम्‍ही काढलेली शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे व्‍यंगचित्रे कोलाजचित्रे यांच्‍या प्रतिमा सबमिट करा. प्रत्‍येक प्रतिमे बरोबर शिर्षक वर्णन व वापरलेल्‍या माध्यमाचा उल्लेख करा.सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

बाहय अवकाश

Children's art contest theme - Outer Space आपल्‍या बाहय अवकाशात म्‍हणजेच अंतरिक्षात काय असावे याचा शोध घेण्यासाठी त्‍या अज्ञात प्रदेशात मनाने प्रवास करा. स्‍वत:ची सर्जनशीलता वापरुन तुम्‍ही तारे, ग्रह, आकाशगंगा, अंतरिक्ष मिशन, अग्निबाण (रॉकेट) आणि वर्तमानात असलेल्‍या समजा पलिकडे जाऊन विचार करा आणि चित्रे काढा, रंगवा. ही चित्रे ए/३ वा ए/४ आकारात काढून त्यांच्‍या प्रतिमा शिर्षक,वर्णन व माध्यम यांचा उल्लेख करुन सबमिट करा.सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

नदीचे गाणे

Contest for children theme - Song of the Riverआपल्‍या नद्या आपल्‍याला पूजनीय आहेत. नदी म्‍हणजे आपल्‍या जीवनरेखा. नद्यांविषयी आपले अस्‍तित्‍व असूच शकत नाही. अनेक शतकांपासून नद्या सर्जनशील मनांना मोहिनी घालत आल्‍या आहेत. लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, चित्रपट निर्माते या सर्वांनी नदीवर मोहित होऊन आपल्‍या कलाकृतीतून त्यांच्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत. तुम्‍ही तुमच्‍या नदी बद्दलच्‍या भावना चित्रातून व्‍यक्‍त करा. तुम्‍ही काढलेली शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे, व्‍यंगचित्रे, कोलाज चित्रे यांच्‍या प्रतिमा, त्‍यांचे शीर्षक, वर्णन आणि वापरलेले माध्यम या माहिती सह सबमिट करा.सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवास डायरी

Art contest for children theme - Travel Diariesप्रवास तर तुम्‍ही केलाच पाहिजे. प्रवास तुम्‍हाला चैतन्‍यशील आणि तरुण ठेवतो. तुम्‍ही केलेला प्रत्‍येक प्रवास तुम्‍हाला नवीन ज्ञान देऊन समृद्ध करेल आणि तुम्‍ही खूप अद्वितीय अनुभव घेऊन परत याल. प्रवासातील तुमची निरिक्षणे आणि अंतर्दृष्टी तुमच्‍या चित्रामधून सर्जनशीलतेने व्‍यक्‍त करा. तुम्‍ही काढलेली A/3, A/4 आकारातील शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, कोलाजचित्रे यांच्‍या प्रतिमा त्‍यांचे शीर्षक,वर्णन व वापरलेले माध्यम या माहिती सह सबमिट करा.सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

खुला

Painting contest for children theme - Open वरील सुचविलेल्‍या विषयांव्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही तुमच्‍या आवडीच्‍या विषयांवर काढलेली चित्रे स्‍विकारयला खुला आसमानला नक्कीच आवडेल. तुमच्‍या निवडीने कोणत्‍याही विषयाचे चित्र A/3, वा A/4 आकारात काढून त्‍यांच्‍या प्रतिमा त्‍यांचे शीर्षक, वर्णन व वापरलेले माध्यम या माहितीसह सबमिट करा. सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा

विज्ञान कल्‍पित कथा स्‍पर्धा

२०४७ मध्ये घडणारी विज्ञान कल्‍पित लघु कथा लिहा (भारताच्‍या स्‍वातंत्र्याला १०० वर्षे झाल्‍याविषयी) तुमची कल्पना जास्तीत जास्त ३०० शब्दात व्यक्त करा अथवा शीघ्रचित्र काढून वर्णन लिहा अथवा एक व्हिडिओ (जास्तीत जास्त १ मिनीटाचे तयार करा व सबमिट करा). सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
Contest for children Khula Aasmaan medal winner Harmandeep Kaur

खुला आसमान स्पर्धेचे निकाल

ज्या कलाकृतींना पुरस्कार म्हणून पदके, (सुवर्ण, रौप्य व कांस्य) मिळाली आहेत, आदरणीय उल्लेख प्रमाणपत्र मिळाले आहे. याशिवाय ज्‍यांची प्रथम फेरीत निवड झाली आहे, अशी कलाकृती येथे पहा.
Khula Aasmaan videos - Painting Workshop at NEMS

व्‍हिडीओज

सृजनशील विचारांना व नवीन उपक्रमांना उत्तेजित करतील व जागतीक दृष्टीकोन विस्‍तृत करतील असे व्‍हिडीओज् येथे पहा. पालक व शिक्षकांसाठीही उपयुक्‍त. पहा
Khula Aasmaan exhibitions - Exhibition at Nehru Centre, Mumbai

प्रदर्शने, कार्यशाळा आणि कार्यक्रम

खुला आसमान ने आयोजित केलेली प्रदर्शने, कार्यशाळा आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांमधील उत्साह आणि उर्जा पहा.
Contest for children Khula Aasmaan medal winner (Art on Postcard) - Nehal Gothi

पोस्‍टकार्डवरील कला

पोस्‍टकार्डवर चित्र रंगवा, ते पोस्‍टकार्ड एका लिफाफ्यात बंद करुन खुला आसमान च्‍या पत्त्यावार पाठवा. पहा

स्‍पर्धेसाठी आलेल्‍या चित्रांची ठिकाणे

भारता बाहेरुन व भारतातील गावे व शहरांमधून खुला आसमान स्पर्धेसाठी खूप मोठया प्रमाणात चित्रे आली आहेत.पहा

बालकलाकार निर्देशिका

भारतभरातून निवडल्‍या गेलेल्‍या बालकलाकारांच्‍या (५ ते १५ वर्षे) सर्जनशील प्रतिभायुक्‍त कलाकृती येथे पहा.

युवा कलाकार निर्देशिका

युवा कलाकारांच्‍या (५ ते १५ वर्षे) खुला आसमान स्‍पर्धेमध्ये निवडल्‍या गेलेल्या कलाकृती येथे पहा.

सहभागी झालेल्‍या शाळा व महाविद्यालये

बाल कलाकार व युवा कलाकारांच्‍या निवडल्‍या गेलेल्‍या कलाकृती या भारतभरातील या शाळा व महाविद्यालयाकडून आल्‍या आहेत. पहा

कला शिक्षक निर्देशिका

ज्‍या कलाशिक्षकांनी विद्यार्थ्यांना खुला आसमानमधे सहभागी होण्यासाठी उत्तेजन व मार्गदर्शन केले त्‍यांची सूची त्‍यांचे प्रोफाईल कलाकृती पहा.पहा